ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. काळा पैसा आणि विदेशातून येणाऱ्या बनावट नोटांना आळा बसावा यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे 500 आणि 1000 च्या नोटा डिपॉझिट करण्यासाठी एटीएमच्या बाहेर अनेकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर देशभरात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. या निर्णयावर नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत तर सोशल मीडियावरही निरनिराळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
No comments:
Post a Comment